'या' राज्याने फस्त केली 19088 कोटींची दारु! रोज 5 लाख लोक करतात मद्यपान; महिलांची संख्या..

हजारो कोटी रुपये कमवले

2023-24 या आर्थिक वर्षात केरळ सरकारने बिअर आणि मद्यविक्रीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये कमवल्याचं समोर आलं आहे.

19 हजार 88 कोटी 68 लाखांची मद्यविक्री

केरळमध्ये मागील आर्थिक वर्षात 19 हजार 88 कोटी 68 लाखांची बिअर आणि मद्यविक्री झाली आहे.

वर्षभरामध्ये तब्बल 16 हजार 609 कोटी कर

या बिअर आणि मद्यविक्रीमधून केरळ सरकारने वर्षभरामध्ये तब्बल 16 हजार 609 कोटी 63 लाखांचा निधी कर स्वरुपात मिळवला.

वितरण कोण करतं?

केरळ स्टेट ब्रेव्हेजर्स कॉर्परेशनच्या माध्यमातून केरळमध्ये होलसेल विक्रीसाठीचं वितरण होते.

वितरणामध्ये एकाधिकारशाही

केरळातील 80 टक्के होससेल मद्याचं वितरण केरळ स्टेट ब्रेव्हेजर्स कॉर्परेशनच्या माध्यमातून होतं.

राज्यात केवळ 20 टक्के मद्य तयार होतं

केरळमध्ये विक्री होणाऱ्या मद्यापैकी 80 टक्के मद्य इतर राज्यातून येतं तर केवळ 20 टक्के मद्य राज्यात तयार होतं.

277 दुकानांमधून मद्यविक्री

केरळ स्टेट ब्रेव्हेजर्स कॉर्परेशनच्या मालकीच्या 277 दुकानांमधून ही मद्यविक्री झाली.

राज्यात एकूण किती लोक मद्यपान करतात?j

केरळमध्ये एकूण 32.9 लाख लोक मद्यपान करतात असंही या आकडेवारीवरुन समोर आलं आहे.

महिलांची संख्या किती?

या 32.9 लाख मद्यपान करणाऱ्यांमध्ये 3.1 लाख महिला आहेत.

रोज किती लोक मद्यपान करतात?

केरळमध्ये दिवसाला 5 लाख लोक मद्यपान करतात.

VIEW ALL

Read Next Story