कागदापासून नाहीतर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा

देशात चार चलनी नोट छापण्याचे प्रेस आणि चार नाण्यांच्या टांकसाळी आहेत. मध्य प्रदेशातील देवास, महाराष्ट्रातील नाशिक, कर्नाटकातील म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधील सालबोनी येथे चलनी नोटा छापल्या जातात.

अनेकांना प्रश्न असेल की, या नोटा कोणत्या कागदापासून बनवल्या जातात, तर यासाठी कागदाचा वापर होत नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण यात कागदाचा वापर नाही करत.

सध्या भारतात 10, 20, 50, 100, 500 च्या नोटा चलनात आहेत. या नोटा तयार करण्यासाठी कागदाचा वापर केला जात नाही. नोटा कागदाच्या बनवल्या तर त्या ओल्या होऊन खराब होतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून येणारे चलन कागदाऐवजी कापसापासून बनवले जाते. कापसापासून बनवलेल्या नोटांना कागदापेक्षा जास्त आयुष्य असते.

RBI च्या अधिकृत वेबसाईटवर बघितले तर कळते की, नोटा बनवण्यासाठी 100 टक्के कापूस वापरला जातो. कापसापासून बनवलेली नोट कागदापेक्षाही मजबूत असते.

भारताशिवाय इतर अनेक देशांमध्येही कापसापासून नोटा बनवल्या जातात. लेनिन नावाचा फायबर कापसात आढळतो आणि त्याच्या मदतीने नोटा तयार केल्या जातात.

VIEW ALL

Read Next Story