पार्टनरसोबत असताना तिला/त्याला प्राधान्य देण्याऐवजी तुम्ही आसपासच्या मुला/मुलींशी वारंवार गप्पा मारत आहात किंवा त्यांच्या दिसण्याचं कौतुक करत आहात तर तुमचं नाते जास्त काळ टिकणार नाही.
नव्या नातेसंबंधामध्ये असताना सतत आपल्या एक्स बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंडच्या आठवणींना उजाळा देणे टाळा. या गोष्टींमुळे तुम्हाला एक्सची आठवण आल्यास चुकूनही ‘मला माझ्या एक्सची आठवण आली’ असं म्हणू नका.
तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड अतिशय संवेदनशील असेल तर त्यांचं मन जपण्याचा प्रयत्न करा.यावर चुकूनही 'तुझ्याच सोबत नेहमी असं का घडतं' किंवा 'सतत का रडत असते/असतो’ असे म्हणून नका.
तुम्हाला आपल्या पार्टनरचा कितीही राग आला असला तरीही I Hate You या तीन शब्दांचा उल्लेख चुकूनही करू नका. या तीन शब्दांमुळे पार्टनर भावनिकरित्या प्रचंड दुखावला जाऊ शकतो.
तू माझ्याशिवाय काहीच करू शकत नाही, हे वाक्य मस्करीमध्ये म्हटलं तर ठीक आहे. पण याच वाक्याचा वारंवार उल्लेख करून पार्टनरला कमी लेखू नका.