पहिली राखी कधी बांधली, रक्षाबंधन का साजरा करतात माहितीये?
Rakshabandhan 2023 : हिंदू संस्कृतीमध्ये अशा अनेक गोष्टी, असे अनेक संदर्भ आहेत ज्यांचा थेट संबंध विज्ञानाशीही जोडला गेला आहे. प्रत्येक सण साजरा करण्यामागे असणारी कारणं हे त्याचं उत्तम उदाहरण.
अर्थात विज्ञानाहूनही भारतात मात्र या सणांच्या पौराणिक बाजूलाच अधिक महत्त्वं देत त्यातून आपल्या दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त असा संदेश, शिकवण अंगी बाणवली जाते.
रक्षाबंधनही त्यापैकीच एक. ही प्रथा सुरुवातीला देवलोकात आणि त्यानंतर पृथ्वीलोकावर आली. काळ पुढे आला तसतशी ही प्रथा बदलत गेली.
देवलोकात अभिमंत्रित रक्षासूत्र अर्थात धागा पत्नीकडून पतीच्या मनगटावर बांधला जात होता. पण, पृथ्वीलोकात मात्र हे रक्षासूत बहीण भावाच्या मनगटावर बांधू लागली.
राहिला प्रश्न पहिल्यांदाच कोणी कोणाला राखी बांधली याचा, तर देवलोकात सर्वप्रथम इंद्राची पत्नी इंद्राणीनं इंद्रदेवाच्या मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधलं होतं.
रक्षासूत्राचा संदर्भ थेट देव आणि दैत्यांच्या युद्धापर्यंत जात असून, असं म्हणतात की गेवगुरू बृहस्पतींनीच इंद्राणींना हे रक्षासूत दिलं होतं.
देवगुरुंच्या सल्लानुसार इंद्राणींनी हे सूत श्रावण पौर्णिमेला पहाटे इंद्राच्या मनगटी बांधलं. देवतांनी युद्ध जिंकलं आणि पृथ्वीलोकापर्यंत याची महती पोहोचली. रक्षासुताचा महिमा पाहून पृथ्वीरही हाच विधी करण्याची सुरुवात झाली आणि इथं रक्षाबंधनाचा पायंडा घातला गेला. (सर्व छायाचित्र- फ्रीपिक)