बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतींवर हिरव्या कापडाने का झाकतात?
पाहताक्षणी असं लक्षात येतं की या जाळीदार कापडावर एखादी वस्तू पडल्यास ती खाली आदळेल की काय. पण हे कापड इतकं जाड असतं की त्यातून कोणतीही गोष्ट बाहेर पडत नाही.
इमारती किंवा बांधकाम सुरु असणाऱ्या भागांमध्ये सातत्यानं सिमेंट, दगड, रेती-मातीचा वापर होत असतो. अशा वेळी या गोष्टी काम सुरु असतानाच इतरत्र पसरत असतात.
बांधकामादरम्यान वापरात येणाऱ्या गोष्टी वाटसरुंच्या अंगावर पडून कोणताही अपघात होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे कापड लावण्यात येतं.
इमारतींवर लावण्यात येणाऱ्या या हिरव्या रंगाच्या कापडामुळं बांधकामादरम्यान उडणाऱ्या धुळीचं प्रमाण कमी होऊन आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत नाही.
हिरवा रंग डोळ्यांना उन्हातही शांत दिसतो त्यामुळे दिवसा किंवा भर उन्हात काम करताना कामगारांना त्रास होत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे हा हिरवा रंग इतर रंगांच्या तुलनेत पटकन अंधारातही दिसतो. दिवसा सूर्यप्रकाशामध्येही तो दुरून तो पटकन लक्षात येतो.
रात्रीच्या वेळी या रंगावर त्यावर थोडासा प्रकाश पडला तरीही तो लगेच दृष्टीक्षेपात येतो. त्यामुळे बांधकामाधीन इमारती हिरव्या कापडाने झाकण्यात येतात.