कर्ज फेडू न शकलेल्यांना RBI चा मोठा दिलासा, नवा नियम माहितेय का?

Pravin Dabholkar
Dec 02,2023


RBI Loan Rule: आजकाल बरेच लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. गृह कर्ज, कार कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज, कर्जाचे अनेक प्रकार आहेत.


जर तुम्ही देखील बँकेकडून कर्ज घेतले असेल तर तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) नियम माहित असले पाहिजेत.


हे RBI नियम तुम्हाला डिफॉल्टपासून वाचवतील आणि EMI कमी करण्यात मदत करतील.


‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ (CIBIL) लोकांच्या कर्ज किंवा क्रेडिट कार्ड खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवते.


लोकांमध्ये असुरक्षित कर्ज (क्रेडिट कार्डमधून खर्च) घेण्याची सवय वाढत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.


तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज घेतलंय पण काही कारणास्तव ते परत करू शकत नाही. अशावेळी तुम्ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्जाची पुनर्रचना करू शकता.


यासह, तुम्हाला नंतर 5 लाख रुपये द्यावे लागतील आणि उर्वरित 5 लाख रुपये दीर्घ कालावधीसाठी हळूहळू भरता येतील. यामुळे तुमच्यावरील EMI चा दबावही कमी होईल.


लोकांसाठी कर्जाची पुनर्रचना करणे हा एक चांगला पर्याय आहे. कारण ते त्यांच्याकडून कर्ज चुकव्याचा टॅग काढून टाकण्यास मदत करते.


जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज थकबाकीदार बनते तेव्हा त्याचा क्रेडिट हिस्टरी खराब होते. यामुळे CIBIL स्कोअरही घसरू शकतो. ज्यामुळे भविष्यात कर्ज घेण्याचा मार्ग बंद होऊ शकतो.


कर्ज देण्यापूर्वी कोणतीही बँक तुमचा CIBIL स्कोर एकदा तपासते. तो त्याच्या मानकांनुसार असेल तरच कर्ज मंजूर करतो. अन्यथा कर्जाची रक्कम नाकारली जाते.

VIEW ALL

Read Next Story