22 जानेवारीला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा होणार असून देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. या सोहळ्याचं देशभरातील रामभक्तांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

Jan 08,2024


या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पूजेसाठी एक खास अगरबत्ती बनवण्यात आली असून ही अगरबत्ती गुजरातमधल्या वडोदरातून अयोध्येसाठी रवाना झाली आहे.


या अगरबत्तीचं वजन जवळपास 3500 किलो इतकं असून 20 किलोमीटर इतकी लांब आहे. हा अगरबत्ती बनवण्यासाठी जवळपास सहा महिने लागले.


अगरबत्ती बनवण्यसाठी गायीचं शेण, गायीचं शुद्ध तूप, झाडाचं लाकूड, हवन सामग्रीचा वापर करण्यात आला आहे.


22 तारखेला म्हणजे राम मंदिर प्राण प्रतिष्ठेला ही अगरबत्ती पेटवण्यात येईल. जवळपास 45 दिवस या अगरबत्तीचा सुंगध अयोध्येत दरवळेल असा दावा करण्यात आला आहे.


या अगरबत्तीची उंची 108 फूट इतकी आहे. वडोदराहून अयोध्येला ही अगरबत्ती 110 फूट लाब रथातून पाठवली जाणार आहे. या अगरबत्तीची किंमत जवळपास 5 लाख रुपये इतकी आहे.


20 किलोमीटर लांब आणि 108 फूट उंच असलेल्या या अगरबत्तीसाठी 1100 किलो वजनाचं खास स्टँड बनवण्यात आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story