राम सेतू बांधलेल्या ठिकाणी पोहोचले पंतप्रधान मोदी

अयोध्येत राम मंदिर सोहळ्याच्या एक दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी प्रभू रामाने आपल्या सैन्यासह राम सेतू बांधला त्या ठिकाणी भेट दिली आहे.

पंतप्रधान मोदी अरिचल मुनई येथे गेले होते. अरिचल मुनई हे राम सेतू बांधले गेलेले ठिकाण आहे असे म्हटले जाते.

पंतप्रधान मोदींनी अरिचल मुनई पॉइंटला भेट दिली. सकाळी 9.30 च्या सुमारास पंतप्रधान तेथे पोहोचले होते.

त्यानंतर पंतप्रधानांनी धनुषकोडी येथील श्री कोठंडारामस्वामी मंदिरात पूजा केली. कोठंडारामा म्हणजे धनुष्य असलेला राम.

धनुषकोडी हे ठिकाण आहे जिथे रामाने रावणाचा पराभव करण्याची शपथ घेतली होती.

त्यानंतर इथल्या पवित्र मातीतूनच राम लंकेकडे निघाला होता. हे भारताच्या आव्हानावर विजय मिळवण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे.

तसेच काही जुन्या कथा असेही सांगतात की याच ठिकाणी भगवान रामाने विभीषणाचा राज्याभिषेक केला होता.

त्याआधी पंतप्रधान मोदींनी शनिवारी श्रीरंगम आणि रामेश्वरममधील श्री रंगनाथस्वामी आणि अरुलमिगु रामनाथस्वामी मंदिरांना भेट दिली.

VIEW ALL

Read Next Story