दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा पंतप्रधान मोदी यांनी भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
चीनच्या सीमारेषेजवळ असलेल्या लेप्चा बॉर्डरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरी केली दिवाळी.
लेप्चा हा दक्षिण लडाख मधील दुर्गम भाग आहे, या प्रदेशात मोठ्या प्रमाणात थंडी असते.
कधी कधी इथला थंडीचा पारा शून्य अंशापेक्षाही खाली जातो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा भाग आहे.
ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली तो मार्ग पूर्वी व्यापारी प्राचीन तिब्बतला जाण्यासाठी वापरत होते.
चीनसोबत झालेल्या वादानंतर लेप्चामध्ये आयटीबीपी अॅक्ट लावले आहेत. त्यामुळे वर्षातील अनेक महिने या ठिकाणी रस्ते बंद असतात.
भारताची लष्कराचा ताकद गेल्या काही वर्षात अनेक पटींनी वाढलेली आहे. देशाच्या सीमांवर अधिक कसोशीने गस्त सुरू आहे आणि म्हणूनच चीन अस्वस्थ आहे.
पंतप्रधान मोदी गेल्या अनेक वर्षांपासून सैनिकांसोबत वेगवेगळ्या भागात जाऊन दिवाळी साजरी करत असतात. सोशल मीडियावर त्यांनी जवानांसोबतचे फोटो शेअर करत सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.