तुम्ही पासपोर्ट बवनण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. आता पासपोर्ट बनवणं सोपं झालंय.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये फक्त एक अॅप डाऊनलोड करायचा आहे. डिजीलॉकरच्या मदतीने तुम्ही कागदपत्राशिवायही पासपोर्ट मिळवू शकतो.
जर तुम्ही अपॉईंटमेंटला जाताना कागदपत्र सोबत घेऊन गेल्यात नाही तरी आता घाबरायची गरज नाही.
डिजीलॉकर हे एक सरकारी प्रमाण app असल्याने पासपोर्टसाठी तुम्ही यावरुन कागदपत्र पडताळणीसाठी देऊ शकता. कागदपत्रांची पडताळणीसाठी तुमच्या फोनवर OTP येतो आणि तुमचं काम होत.
कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर 15 दिवसांपासून ते 1 महिन्यामध्ये पासपोर्ट घरी येतो.
सामान्य पासपोर्टसाठी 1500 आणि जास्त पानं हवी असेल तर 2000 रुपये लागतात.