मुलांचे पहिले शिक्षक त्यांचे आईवडील असतात. जे त्यांच्या शारीरिक, मानसिक विकासात महत्वाची भूमिका बजावतात.
त्यामुळे लहानपणी मुलांना काही गोष्टी शिकवणे गरजेचे असते.
अशा 8 गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या तुमच्या मुलांना शिकवणे गरजेचे आहे.
दुसऱ्यांच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकायला आणि बोलायला शिकवा. दुसऱ्यांना सन्मान द्यायला. तसेच बोलणाऱ्याच्या मध्येच बोलू नये, हे देखील शिकवा.
दुसऱ्यांशी बोलताना सन्मानजनक शब्दांचा वापर करावा. रागात असेल तरी शांतपूर्ण पद्धतीने आपले मतभेद योग्य शब्दात मांडायला शिकवा.
खेळताना आपला डाव येईपर्यंत वाट पाहण्याची मुलांना सवय नसते. बोलताना, खेळताना आपली वेळ येण्याची वाट पाहावी आणि इतरांनाही संधी द्यावी.
मुलांना शेअरिंग शिकवायला हवं. आपला वेळ, अटेंशन दुसऱ्यांना द्यायला शिकवा.
मुलांना स्वत:चे काम स्वत: करायला शिकवा. हात स्वच्छ धुणे. जेवल्यावर टेबल स्वच्छ करणे. शूज योग्य जागी ठेवणे इ.
दुसऱ्याच्या वस्तुला हात लावण्याआधी, एखाद्याच्या खोलीत जाण्याआधी परवानगी घेण्यास शिकवा.
स्वच्छ राहायला शिकवा. हात धुवायला शिकवा. खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल घ्यायला शिकवा.
दुसऱ्यांना मदत करायला शिकवा. यामुळे बाळ मोठेपणी चांगले नागरिक बनेल.