अजबगजब परंपरा! 'असा' देश जिथे प्रसूतीवेळी महिलांना रडण्यास मनाई

आई बनणं हा प्रत्येक महिलेच्या जीवनातला सुखद अनुभव असतो. असं असलं तरी बाळाला जन्म देताना तिला खूप यातना सहन कराव्या लागतात.

या कळांमुळे आईदेखील बाळासोबत दुसरा जन्म घेत असते असे म्हणतात.

प्रसुतीवेळी अनेकदा महिलांची तब्येत इतकी बिघडते की सी सेक्शन करावे लागते.

आधुनिक काळात डॉक्टर इंजेक्शनच्या सहाय्याने या वेदना कमी करतात.

प्रसुतीवेळी महिलांनी रडू नये अशी परंपरा एका देशात चालवली जाते.

उत्तर नायझेरियाच्या हौसा समुदायाचे लोक प्रसुतीवेळी वेदना व्यक्त न करण्यासाठी महिलांवर दबाव आणतात.

येथील फुला जमातीच्या मुलींना लहानपणापासूनच याबद्दल शिकवले जाते.

प्रसूतीवेळी महिलांनी ओरडणं, दु:ख व्यक्त करणं त्यांची कमजोरी दर्शवते, असे मानले जाते.

ओरडण्याने वेदना कमी होत नाहीत. त्यामुळे निमूटरणे वेदना सहन कराव्यात असे सांगितले जाते.

VIEW ALL

Read Next Story