1,46,56, 566 ची संपत्ती, 3 घरं, सोनं, 8 बँक खाती....; राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांची मालमत्ता किती?

भाजपाने मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

भाजपाने भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे.

याशिवाय त्यांच्याकडे सोनं, 3 घरं, गाड्या आणि अनेक महागड्या गोष्टी आहेत. याशिवाय त्यांच्यावर लाखोंचं कर्जही आहे.

1,46,56, 566 रुपयांची स्थायी आणि अस्थायी संपत्ती

भजनलाल शर्मा यांच्याकडे 1,46,56, 566 रुपयांची स्थायी आणि अस्थायी संपत्ती आहे. तसंच 35 लाखांचं कर्ज आहे.

बँक खात्यात किती पैसे?

तसंच त्यांच्याकडे आणि पत्नीकडे 2 लाख 65 हजारांची रोख रक्कम आहे. 8 बँक खात्यात पती आणि पत्नीच्या नावे 11 लाख 52 हजार 746 रुपये जमा आहेत.

जीवन विमा योजना

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, भजनलाल आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे एलआयसी आणि एचडीएफसीमध्ये जीवन विमा योजना आहे, ज्यात 2 लाख 83 हजार 817 रुपये आहेत.

गाड्या

त्यांच्याकडी टीव्हीएस व्हिक्टर आणि टाटा सफारी या दोन कार आहेत. ज्यांची किंमत 5 लाख 35 हजार आहे.

सोनं आणि चांदी

भजनलाल यांच्याकडे 3 तोळं सोनं आणि 2 किलो चांदीही आहे.

दोन घरं

त्यांच्याकडे दोन घरं आणि एक फ्लॅट आहे. ज्यांची किंमत 1 कोटी आहे.

भजनलाल यांनी मुलाच्या शिक्षणासाठी 30 हजारांचं शैक्षणिक कर्ज घेतलं आहे.

VIEW ALL

Read Next Story