पहिल्या क्रमांकावर नवी दिल्ली - वाराणसी वंदे भारत आहे, हिचा वेग ताशी 96.37 किमी आहे.

हजरत निजामुद्दीन - रानी कमलापति वंदे भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिचा वेग ताशी 95.89 किमी आहे.

चेन्नई-कोईम्बतूर आणि नवी दिल्ली - अंब अंदौरा अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. यांचा वेग ताशी 90.36 आणि 84.85 किमी आहे.

पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाव सिकंदराबाद - विशाखापट्टणम (ताशी 84.21 किमी) आणि गांधीनगर-मुंबई (ताशी 83.87 किमी) आहेत.

अजमेर-दिल्ली कँट (ताशी 83.10 किमी) आणि नवी दिल्ली - श्री माता वैष्णोदेवी कटरा (ताशी 81.87 किमी) सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत.

सिकंदराबाद - तिरुपती वंदे भारत आणि चेन्नई - म्हैसूर नवव्या आणि 10 व्या क्रमांकावर आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे ताशी 79.63 आणि 79.36 किमी आहे.

11 व्या आणि 12 व्या क्रमांकावर नागपूर - बिलासपूर (ताशी 77.92 किमी) आणि हावडा - न्यू जलपैगुडी (ताशी 76.84 किमी) आहेत.

मुंबई - सोलापूर वंदे भारत 13 व्या क्रमांकावर आहे. हिचा वेग ताशी 71.65 किमी आहे.

14 व्या आणि शेवटच्या क्रमांकावर मुंबई - शिर्डी वंदे भारत आहे. हिचा वेग ताशी 65.96 किमी आहे.

VIEW ALL

Read Next Story