बाबरपासून शहाजहापर्यंतचे सर्व शासक खूप नशा करायचे. काहींना दारु प्यायला आवडायची तर काही अफीम आणि तंबाखूचे शौकीन होते.
मुघल वंशाचा संस्थापक बाबरचा पणतू जहांगिर असा बागशाह होता जो 20 ग्लास दारु प्यायचा.
मुघल शासकांच्या दरबारी दारुचे सेवन किरकोळ मानले जायचे. दारुसोबत मनोरंजन व्हायचे. सोबत राजकीय, सामाजिक चर्चा रंगायच्या.
मुघल शासक कुठून दारु आणायचे आणि ती कशी बनवली जायची?
मुघलांसाठी दारु इराणवरुन यायची. ही पर्शियाची बेस्ट दारु होती. द्रांक्षांमधून ही बनवली जायची.
द्राक्षांवर प्रक्रिया केली जायची. मुघलांसाठी पारस आणि मध्य आशियातून दारु मागवली जायची.
यूरोपमधून दारु आणली जायची. पोर्तुगाल आणि डच ही दारु आणायचे. विशेष अतिथींसाठी ही दारु ठेवली जायची.
फारसमधून शिराज दारुची आयात केली जायची. त्या काळी ही बेस्ट दारु मानली जायची.