भगवान शिवानं द्रौपदीला सांगितलं होतं की तुझ्या कठोर तपश्चर्येने मी आनंदी आहे, परंतु एका व्यक्तीमध्ये 14 गुण असणं शक्य नाही.
मात्र, द्रौपदी तिच्या अटीवर अटळ राहिली, अशा स्थितीत भगवान शिव म्हणाले की, पुढील जन्मात तुला 14 पतींच्या रूपात इच्छित वरदान मिळेल.
द्रौपदीच्या वरदानानुसार तिला धर्म, सामर्थ्य, संयम, देखणा आणि धनुर्धर या सर्व गुणांनी युक्त असा वर हवा होता.
पाच पांडवांमध्ये एकूण 14 गुण होते, द्रौपदीने भगवान शिवाला विचारलं की हा वरदान आहे की शाप?
दुर्योधनालाही द्रौपदीशी लग्न करायचे होते पण द्रौपदीची अट होती की जो तिच्याशी लग्न करेल तो दुसऱ्याशी लग्न करू शकत नाही.
दुर्योधनाचा विवाह कलिंगाची राजकन्या भानुमतीशी झाला होता.
द्रौपदीचा पूर्वीचा जन्म नलयणी, ती नल आणि दमयंती यांची कन्या होती.
ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे, ज्याची झी मीडिया पुष्टी करत नाही