'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मारली मुसंडी

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जोरदार मुसंडी मारत विजयाची हॅटट्रीक साधली आहे.

एनडीएला 292 जागा

एनडीएमधील घटक पक्षांना एकूण 292 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं निश्चित मानलं जात आहे.

तिसऱ्या टर्मचे स्पष्ट संकेत

निकाल लागल्यानंतर नवी दिल्लीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींनी तिसऱ्या टर्मचे स्पष्ट संकेतही दिले आहेत.

मेलोनी यांची प्रतिक्रिया

भाजपाच्या या विजयावर पंतप्रधान मोदींनी 'गुड फ्रेंड' म्हणणाऱ्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

सेल्फीमुळे चर्चेत आलेल्या इटालियन पंतप्रधान

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा एक सेल्फी शेअर केल्याने मेलोनी चर्चेत आलेल्या.

#Melodi असा हॅशटॅग वापरलेला

जॉर्जिया मेलोनी यांनी डिसेंबर महिन्यात एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) सेल्फी शेअर करताना #Melodi असा हॅशटॅग वापरला होता. कॅप्शनमध्ये “सीओपी-28 मधील चांगले मित्र” असं लिहिलं होतं.

फोटो प्रचंड व्हायरल

मेलोनी यांनी पोस्ट केलेल्या सेल्फीमध्ये पंतप्रधान मोदी आणि मेलोनी हसत होते. हा फोटो प्रचंड व्हायरल झालेला.

हस्तांदोलन करताना फोटो

आपल्या 'चांगल्या मित्रा'ला म्हणजेच मोदींना शुभेच्छा देतना मेलोनी यांनी हस्तांदोलन करताना फोटो शेअर केला आहे.

मला विश्वास आहे की..

"नरेंद्र मोदींनी निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन. चांगल्या कामासाठी माझ्या शुभेच्छा. मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र काम करु," असं मेलोनी म्हणाल्या आहेत.

लोकांच्या भल्यासाठी

"भारत आणि इटलीमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करतानाच दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या विषयांमधील सहकार्यही वाढवू. दोन्ही देशांच्या तसेच आपल्या लोकांच्या भल्यासाठी आपण एकत्र काम करु," असं मेलोनी म्हणाल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story