महाराष्ट्रातल्या लोकांच्या जेवणामध्ये कोथिंबीरीचा वापर केला जातो.
मात्र फ्रिजमध्ये कोथिंबीर ठेवायची म्हटलं की, कठीण काम. कारण अनेकदा जास्त दिवस कोथिंबीर ठेवली तर ती काळी पडते आणि खराब होते.
अशावेळी कोथिंबीरीच्या जुड्या कशा साठवून ठेवाव्यात हा प्रश्न असतो.
आज आपण जाणून घेऊया, जुड्या कशा पद्धतीने साठवून ठेवाव्या. ज्या १५ ते २० दिवस तरी फ्रेश राहू शकतील.
कोथिंबीर बरेच दिवस टिकवून ठेवण्यासाठी करणाऱ्या उपायासाठी कोथिंबीर निवडून ठेवण्याचीही गरज नाही. यासाठी आपल्याला काचेची बरणी आणि पाणी या दोनच गोष्टी लागणार आहेत
बाजारातून आणलेली कोथिंबीरची जुडी मोकळी करून घ्या.
एका काचेच्या बरणीमध्ये पाणी टाका. साधारण बरणी अर्धी भरेल एवढे पाणी घ्या.
बरणीत कोथिंबीरची जुडी खोचून ठेवून द्या. कोथिंबीरीचे देठ पाण्यात बुडतील याची काळजी घ्या.
ही बरणी फ्रिजमध्ये ठेवून द्या आणि जेवढी पाहिजे तेवढीच कोथिंबीर दरवेळी तोडून घ्या.