मुलाखतीची चांगली तयारी करा. कंपनी आणि पदाबद्दल चांगली तयारी करा. संभाव्य प्रश्नांचा अभ्यास करा आणि उत्तरांची तयारी करा.
मुलाखतीसाठी चुकूनही उशीरा पोहोचू नका. अन्यथा मुलाखतीविनाच तुम्ही रिजेक्ट होऊ शकता.
मुलाखत देताना आपला फोन बंद ठेवा. शक्य नसेल तर सायलेंटवर ठेवा.
आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. स्वत:च्या योग्यता आणि अनुभवावर विश्वास ठेवा.
बॉडी लॅंग्वेजवर लक्ष द्या. सरळ बसा. डोळ्यांशी संपर्क ठेवा. चेहऱ्यावर हास्य ठेवा.
मुलाखतीदरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्पष्ट आणि संक्षिप्त उत्तर द्या. अनावश्यक माहिती देत राहू नका.
उदाहरणासहित उत्तर द्या. यामुळे तुम्ही चांगला प्रभाव टाकू शकता.
मुलाखतीनंतर मनात काही प्रश्न असतील तर विचारा. यामुळे तुमची आवड आणि उत्साह लक्षात येईल.