Jaya Kishori: जया किशोरी यांचा साधेपणा आणि त्यांच्या कथांचे लाखो चाहते आहेत. जया किशोरीने यांनी तरुणांना खऱ्या प्रेमाची व्याख्या सांगितली आहे. जी इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.
जया किशोरी लोकांना धार्मिक पुस्तकांनुसार जीवन जगण्याचे मार्ग सांगतात. जया किशोरी एक कथाकार तसेच प्रेरक वक्त्या आहेत. त्या प्रत्येक विषय लोकांना समजावून सांगतात आणि प्रेरित करतात.
जया किशोरी यांनी खऱ्या प्रेमाची व्याख्या सांगितली आहे. तुमच्याकडे जे आहे ते एखाद्याला देणे याला प्रेम म्हणतात. आपण स्वतःसाठी जे करतो त्याला प्रेम म्हणतात.
नातं सदैव जपायचं असेल तर तुम्हाला प्रेमाची खरी व्याख्या समजून घ्यावी लागेल आणि तुमचं नातं खऱ्या मनानं जपायला हवं.
खरे प्रेम हे नेहमीच निस्वार्थ असते, ज्यामध्ये आपण कोणाकडूनही अपेक्षा ठेवत नाही. प्रेमात स्वार्थ जोडला गेला असेल तर ते खरे प्रेम नाही, असे त्या सांगतात.
खोटे प्रेम हे बौद्धिक, शारीरिक, आर्थिक काम पूर्ण होईपर्यंतच टिकू शकते. यात तुमचे काम झाले की प्रेम त्याच दिवशी आणि वेळेला संपेल.
प्रेम एखाद्याला बनवू शकते आणि एका मिनिटात कोणाचा नाशही करू शकते. प्रेमात फसवणूक करू नका, पण नाते मनापासून जपावे.
इतरांवर प्रेम करण्यापूर्वी स्वतःवर प्रेम करणे आवश्यक आहे, ज्या दिवसापासून माणूस स्वतःवर प्रेम करायला शिकेल त्या दिवसापासून आयुष्य सुंदर होईल.