हिरा चाटल्याने खरंच माणसाचा मृत्यू होतो का?

हिरा हे सर्वात महागडं आणि बहुमूल्य रत्न म्हणून ओळखलं जातं. दागिन्यांमध्ये तसंच काच कापण्यासाठी हिऱ्याचा वापर होतो.

हिरा हा पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ मानला जातो. हे रत्न कार्बनचे घनरूप आहे.

हिरा चाटल्याने माणसाचा मृत्यू होतो असा दावा आहे. पण या दाव्यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊयात.

हिरा चाटल्याने मृत्यू होतो हे अजिबात सत्य नसून, एक अफवा आहे.

हिरा म्हणजे काही विषारी पदार्थ नव्हे जो चाटल्यावर माणसाचा मृत्यू होईल. अनेक तज्ज्ञही हा दावा फेटाळतात.

पण जर एखाद्या व्यक्तीने हिरा गिळला तर मात्र त्यामुळे धोका वाढू शकतो आणि त्याचा जीव जाऊ शकतो.

हिरा इतका टणक असतो की कोणीही तो चावून खाऊ शकत नाही. पण त्याच्यावर प्रहार करुन तोडता येतं.

जर तुम्ही हिऱ्याला ओव्हनमध्ये ठेवून 763 डिग्री सेल्सिअसवर गरम केलं तर तो जळून कार्बन डाय ऑक्साइड होतो.

हिऱ्याची रासायनिक रचना अशी आहे की, तो जळाल्यानंतर त्याची राखही राहत नाही.

VIEW ALL

Read Next Story