केरळच्या 4 ठिकाणी फिरा तुमच्या बजेटमध्ये, IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज!

Pravin Dabholkar
Jan 10,2024


IRCTC Tour Package: जर तुम्ही जानेवारी ते मार्च दरम्यान केरळला भेट देण्याचा विचार करत असाल तर IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम पॅकेज घेऊन आले आहे.


या पॅकेजमध्ये तुम्हाला कोची ते मुन्नार प्रवास करण्याची संधी मिळेल. या पॅकेजमधून तुम्ही बजेट ट्रीप करु शकता. कसे? ते जाणून घेऊया.


जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भेट देण्याची संधी मिळेल. IRCTC च्या या पॅकेजचे नाव Celestial Kerala Ex Mumbai (WMA41) आहे. या पॅकेजसाठी वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.


11 जानेवारी, 11 फेब्रुवारी आणि 5 मार्च 2024 रोजी या टुअर्स निघणार आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणतेही पॅकेज बुक करू शकता.


5 रात्री आणि 6 दिवसांचे हे पॅकेज मुंबईपासून सुरू होणार आहे. यामध्ये तुम्हाला फ्लाइटच्या कम्फर्ट क्लासमध्ये प्रवास करता येईल.


या पॅकेजमध्ये तुम्हाला कोची, मुन्नार, थेक्कडी आणि कुमारकोम सारख्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.


या पॅकेजमध्ये फ्लाइटची तिकिटे, नाश्ता आणि रात्रीचे जेवण, 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, हाऊसबोटमध्ये प्रवास, एक जेवण आणि चहा, मरीन ड्राइव्ह आणि कोचीमधील पेरियार लेक, थेक्कडी येथील बोट राइड, प्रवेश तिकीट, टूर गाइड, विमा आणि जीएसटी इत्यादींचा समावेश आहे.


पॅकेजसाठी आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या किमती नमूद केल्या आहेत. पॅकेज 39 हजार 600 रुपयांपासून सुरू होते.


तुम्हाला हे पॅकेज बुक करायचे असल्यास, तुम्ही IRCTC वेबसाइट irctctourism.com वर जाऊन बुक करू शकता.

VIEW ALL

Read Next Story