रुबाबदार वाघ

भारतातील 'या' राष्ट्रीय उद्यानांमध्ये नक्की दिसेल रुबाबदार वाघ; फेरी वाया जाणारच नाही

वैश्विक व्याघ्र संमेलन

2010 मध्ये सेंट पिटर्सबर्ग येथे झालेला वैश्विक व्याघ्र संमेलनामध्ये ही संकल्पना पुढे करण्यात आली होती. जिथं भारत, रशिया, चीन यांसारखे अनेक देश पुढे येत त्यांनी या प्राण्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली होती.

वाघांच्या संख्येत वाढ

देशात मध्य प्रदेशात वाघांची संख्या जास्त असून, ही संख्या वाढतानाच दिसत आहे. 2000 मध्ये इथं अवघे काही वाघच अस्तित्वात होते. आता मात्र हा आकडा 22 वर पोहोचला आहे.

प्रत्यक्षात पाहा वाध

तुम्हाला माहितीये का, भारतात काही अशी राष्ट्रीय उद्यानं आहेत जिथं जाऊन तुम्ही वाघ प्रत्यक्षात पाहू शकता.

रणथंबोर

देशातील सर्वात मोठा व्याघ्रप्रकल्प असणाऱ्या राजस्थानमधील रणथंबोर येथे बंगाल टायगर्स प्रजातीचे वाघ आढळतात. इथं तुम्ही कोल्हे, अस्वल असे इतर वन्यजीवही पाहू शकता.

जिम कॉर्बेट

उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात 1936 मध्ये झाली. इथं तुम्ही हत्तीच्या पाठीवर बसून, अर्थात सफारीचा आनंद घेत जंगलातील वाघ आणि इतर वन्यजीव पाहू शकता.

बांधवगड

देशातील अतिशय महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक म्हणजे बांधवगड. दर दिवशी शेकडो पर्यटक इथं भेट देत Royal Bengal Tigers पाहण्याचा अनुभव घेतात.

कान्हा

कान्हा व्याघ्र प्रकल्प, कान्हा राष्ट्रीय उद्यान हे आशिया खंडातील लोकप्रिय ठिकाण असल्याचं कळतं. इथं आलं असता तुम्हाला वाघाचं दर्शन होतंच शिवाय अस्वल, विविध प्रजातींचे पक्षी, हक्की या आणि अशा अनेक वन्य जीवांना पाहण्याची संधीही मिळते.

काझिरंगा

आसाममध्ये असणारं काझिरंगा राष्ट्रीय उद्यान हे जागतिक वारसा असणारं एक ठिकाण आहे. इथं तुम्हाला वाघासोबतच भलेमोठे गेंडे पाहण्याचीही संधी मिळते.

सापुतारा

जैवविविधतेचं अद्वितीय उदारहण असणारं आणखी एक राष्ट्रीय उद्यान म्हणजे सापुतारा. विविध प्रकारत्या वनस्पती आणि तिथं वावरणारे प्राणी इथलं आकर्षण असून, तिथं दिसणारा पट्टेदार वाघ म्हणजे क्या बात! (सर्व छायाचित्र- फ्रीपिक)

VIEW ALL

Read Next Story