Interesting Facts

Interesting Facts : 50 रुपयांच्या नोटेवर दिसणारा 'हा' रथ कुठंय माहितीये?

Oct 26,2023

विविध मूल्यांच्या नोटा

विविध मूल्यांच्या नोटा भारतात चलनात वापरल्या जातात. या नोटांवर काही गोष्टींमध्ये बरंच साम्य असतं.

ठळक वैशिष्ट्य

ती शपथ असो, गव्हर्नरची स्वाक्षरी असो किंवा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो असो.

चलनातील नोटा

भारतीय चलनात असणाऱ्या नोटांमध्ये मागच्या बाजूला काही ऐतिहासिक ठिकाणांची चित्र असतात.

भारतीय संस्कृती

चलनांच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत भारताची संस्कृती पोहोचवणं हा त्यामागचा मुख्य हेतू असतो. 50 रुपयांच्या नोटेमागंही असंच एक चित्र आहे.

हम्पीमधील विठ्ठल मंदिर

50 रुपयांच्या नोटेवर हम्पीमधील विठ्ठल मंदिर या ठिकाणी असणाऱ्या एका भव्य रथाचं चित्र आहे. भारतातील तीन दगडी रथांपैकी हा एक भव्य रथ हम्पीमध्ये आहे.

केव्हा येताय हम्पीच्या सफरीवर ?

देशभरात आणि जगातही या ठिकाणाचं अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्वं आहे. हम्पी हे ठिकाण कर्नाटकमध्ये असून, तिथं तुम्हीही भटकंतीसाठी पोहोचू शकता. मग, केव्हा येताय हम्पीच्या सफरीवर ?

VIEW ALL

Read Next Story