Indian Railway

...तर पैसे कापले जाणार; Indian Railway च्या कन्फर्म तिकीटाबाबत नवा नियम

Feb 22,2024

रेल्वे तिकीट बुकींग

रेल्वे तिकीट बुक करत असताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातही मनस्तापाचा सामना करणाऱ्यांचा आकडा मोठाच आहे.

वेटिंग लिस्ट

रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या वेळी तिकीट Waiting List मध्ये मध्ये असतानाही तिकीटाचे पैसे मात्र खात्यातून कापले जातात.

पैसे परत घेण्याची वेळ

पुढं हे पैसे परत घेण्याची वेळ येते तेव्हा प्रवाशांना बरीच डोकेदुखी सहन करावी लागते. याच समस्येवर रेल्वे विभागानं काम केलं आहे.

नवी सुविधा

IRCTC नं एक नवी सुविधा आणली आहे. ज्याअंतर्गत तिकीट कन्फर्म झालं तरच खात्यातून पैसे कापले जाणार आहेत.

ऑनलाईन तिकीट

ऑनलाईन तिकीट बुक करताना 'पेमेंट गेटवे' पर्यायाअंतर्गत हे फिचर दिसेल. 'आय पे ऑटो पे' असं त्या फिचरचं नाव. इथं तिकीट बुक केल्यानंतर पैसे कापले जाणार नसून, फक्त ब्लॉक होणार आहेत.

कसं काम करतं फिचर?

एखाद्या आयपीओमध्ये पैसे गुंतवल्याप्रमाणं हे फिचर काम करतं. ज्याप्रमाणं नफा मिळ्यास इथं खात्यावर पैसे जमा होतात आणि न मिळाल्यास ते खात्यातच कायम राहतात असंच हे फिचर काम करतं.

VIEW ALL

Read Next Story