रेल्वे आरक्षण

रेल्वे आरक्षणाच्या तिकीटावर RSWL, CKWL लिहिल्यास त्याचा नेमका अर्थ काय? आताच जाणून घ्या

रेल्वे तिकीट

रेल्वेनं प्रवास करायचा म्हटलं की सर्वप्रथम गरज असते ती म्हणजे तिकिटाची. कारण याच तिकीटाच्या आधारावर आपल्याला इच्छित स्थळी पोहोचता येतं.

कन्फर्म तिकीट

ही तिकीट मिळवण्यासाठीसुद्धा जीवाचा आटापिटा करावा लागतो. कारण, ती Confirm असणंही तितकंच महत्त्वाचं.

वेटिंग लिस्ट

ज्या प्रवाशांची रेल्वे तिकिट कन्फर्म होत नाही, त्यांची नावं वेटिंग लिस्टमध्ये जातात. अशा प्रवाशांना आसनव्यवस्था मिळत नाही. भारतीय रेल्वेमध्ये अशा विविध प्रकारच्या वेटिंग लिस्ट आहेत.

CODE

तिकिटावर लिहिलेल्या CODE मधून तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही, याबाबतची स्पष्टोक्ती होते. थोडक्यात रेल्वेचा Chart लागण्याआधीच तुम्हाला तिकीच कन्फर्म होईल की नाही याचाही अंदाज येतो.

यासाठी काय करावं?

यासाठी काय करावं? तर तिकीटावर देण्यात आलेला कोड लक्षपूर्वक पाहावा. वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या तिकीटांवर PQWL, RSWL, CKWL आणि QNWL असे कोड असतात.

तत्काळ तिकीट

जी तिकीट तत्काळमध्ये काढली जाते आणि जी कन्फर्म नसते ती CKWL श्रेणीत जाते. तुमच्या तिकीटावर हा कोड असल्यास ते कन्फर्म होण्याची शक्यता फारच कमी असते.

RSWL कोड

तिकीटावर RSWL असा कोड असल्यास त्याचा अर्थ होतो रोड साइड स्टेशन वेटिंग लिस्ट(Road Side Waiting List). आता तुम्ही म्हणाल हा कोड नेमका कशासाठी?

समजून घ्या अर्थ

जेव्हा एखाद्या प्रवाशानं रेल्वेचं तिकीट त्याच्या पहिल्या स्थानकाऐवजी नजीकच्या एखाद्या स्थानकावरून काढलेली असेल तेव्हा तिकीटावर हा कोड देण्यात येतो. वेटिंग लिस्टमधील अशी तिकीटंही कन्फर्म होण्याची शक्यता तशी कमी असते.

पश्चातापाची वेळ टाळा

त्यामुळं रेल्वेचं तिकीट काढत असताना तुम्ही काढताय ते तिकीट नेमकं कोणत्या श्रेणीत आहे आणि त्यावर कोणता कोड छापून आला आहे यावर नक्की लक्ष द्या म्हणजे प्रवासाच्या वेळी पश्चाताप टळेल.

VIEW ALL

Read Next Story