देशभरात दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात.
ट्रेनची वाट पाहताना प्रवाशी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.
रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळी रेष आणि त्यावरील गोळेदेखील असेच दुर्लक्षित केले जातात.
पण प्लॅटफॉर्मवर पिवळी रेष आणि त्यावर गोळे का असतात? कधी विचार केलाय का?
अनेकदा प्रवासी ट्रेनची वाट पाहत प्लॅटफॉर्मच्या शेवटाकडे येऊन उभे राहतात.
तुम्ही रेषेच्या अलीकडे राहायला हवे, हे संकेत तुम्हाला पिवळी रेष देत असते.
पिवळ्या रेषेच्या पलीकडे गेल्यास प्रवासी दुर्घटनाग्रस्त होण्याची शक्यता असते.
या पिवळ्या रेषेचे डिझाइन जमिनीपासून वरच्या बाजूस असते. ज्यावर गोळे बनलेले असतात.
पिवळ्या रेषेवर गोळे दिव्यांगासाठी बनलेले असतात. रेषेवरुन चालताना ते सतर्क होतात.