भारतात अशा खूप सुंदर जागा आहेत जिथे पर्यटकांना जाण्यास बंदी आहे.
अंदमान येथील नॉर्थ सेंटिनल आयलॅंड हे आदिवासी जनजाती संरक्षण 1956 च्या नियमात येते. हे अंदमान-निकोबार येथे येते. येथे 50 ते 150 आदिवासी संख्या असावी.
लडाखमधील अक्साई चीन हा भाग चीन आपला असल्याचा दावा करते. या भाग सुंदरतेने भरलाय पण येथे कोणी जाऊ शकत नाही.
लडाखमधील पेंगोंगच्या वरच्या भागात कोणी जाऊ शकत नाही. येथील दरीचा 50 टक्के भाग चीनसोबत वादग्रस्त म्हणून ओळखला जातो.
बॅरन आयलॅंडवर भारतातील एकमेव ज्वालामुखी आहे. जहाजातून दुरवरून हे पाहू शकता पण जाण्यास बंदी आहे.
सिक्किम येथील चोलामू लेक ही जगातील मोठ्या दऱ्यांपैकी एक आहे. पण इथे सर्वसामान्यांना जाण्यास बंदी आहे.