पाहा स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केली 'ही' लक्षवेधी विधानं 'समस्येवर शांततेतून मार्ग काढणार', मणिपूर मुद्द्यावर मोदींची ग्वाही
'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या तत्त्वावर देश पुढे जातो आहे'
'भारतीयांकडे नीरक्षीर विवेक बुद्धी त्यामुळेच त्यांनी पूर्ण बहुमताचं सरकार दिलं'
'देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतो तेव्हा फक्त तिजोरी भरत नाही, तर देशाचं सामर्थ्य वाढतं, देशवासियांचं सामर्थ्य वाढतं.'
'2014 मध्ये आपण वैश्विक अर्थव्यवस्थेच्या यादीत 10 व्या स्थानावर होतो आणि आज 140 देशवासियांची मेहनत फळली असून, आपण या यादीत पाचव्या स्थानी पोहोचलो आहोत'
'महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतानं प्रचंड प्रयत्न केले. मागील प्रयत्नांच्या तुलनेत आम्हाला यशही मिळालं. पण, इतक्यावरच आनंद मानता येणार नाही. माझ्या देशवासियांवर महागाईचं ओझं कमी व्हावं या दिशेनं मलाही पावंलं उचलायची आहेत.'
'जनऔषध केंद्रानं देशातील वयोवृद्धांना आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना नवी ताकद दिली आहे. हे यश पाहता आता देशात 10 हजार केंद्रांची संख्या 25 हजार केंद्रांवर नेण्यात येणार आहे.'
'जगभरात देशाच्या सामर्थ्याप्रती नवा विश्वास निर्माण झाला आहे. आज देशाच्या विविधतेला संपूर्ण जग अचंबित होऊन पाहत आहे.'
'ज्यांचा पाया आमचं सरकार रचतं त्या गोष्टींचा शुभारंभ, उदघाटनही आम्ही आमच्याच कार्यकाळात करतो'