19 व्या शतकातील या मंदिरासमोर तुम्ही उभे राहिल्यावर तुम्ही त्याच्या चित्तथरारक सौंदर्याने थक्क व्हाल. मुघल, राजस्थानी, मराठी आणि ब्रिटिश वास्तुशिल्प शैलीचे मिश्रण म्हणजे हे मंदिर आहे.
हाथी सिंह जैन मंदिर हे दुमजली मंदिर पांढऱ्या संगमरवरी बनवलेले आहे आणि 52 देवस्थान आणि 11 देवतांचे निवासस्थान आहे. तीर्थंकरांची प्रतिमा असलेली ही जागा मनाला शांतता देते.
अहमदाबाद हे 15 व्या शतकापासून ते एक व्यापारी केंद्र आहे. कॅलिको म्युझियम हे एक ठिकाण आहे जे तुम्हाला कपड्यांची नवी ओळख करून देतं. इथं काश्मिरी शाल पहायला विसरू नका.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या युगातील महत्त्वाचं केंद्रस्थान असलेलं साबरमती आश्रम तुम्हाला महात्मा गांधी यांच्या सहवासाचा अनुभव करून देईल. शांतमय असा हा परिसर तुम्हाला मंत्रमुग्घ करेल.
वास्तुशास्त्रीय भव्यतेमुळे डोळ्यांना आनंद देणारी वास्तू म्हणजे सिदी सय्यद मशीद. ट्री ऑफ लाइफ विंडो पहायला विसरू नका.
ऐतिहासिक वास्तूला तीन कमानी किंवा दरवाजा असून मध्यवर्ती कमान १७ फूट रुंद आणि इतर दोन १३ फूट रुंद असून त्यांना चार दरवाजा आणि वाघ दरवाजा म्हणतात.
देशातील सर्वात जुन्या मशिदींपैकी एक अशी 14 व्या शतकात अहमद शाहने बांधलेली जामा मशीद नक्की पाहा.
तुम्हाला बोटीतून प्रवास करण्याचा असेल आणि निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेयचा असेल तर कांकरिया तलावाला जाऊ शकता. लेझर लाइट शो तुम्हचं मन जिंकून जाईल.