माणसाच्या मलमुत्रापासून बनलं जेटचं इंधन! वैज्ञानिकांनी केली कमाल

माणसाचं वेस्ट प्रोडक्ट बेस्ट प्रोडक्ट सिद्ध झालंय. वैज्ञानिकांनी ही कमाल केली आहे.

इंग्लंडचे वैज्ञानिक स्वस्त एरोप्लेन इंधन बनवण्यासाठी बायो वेस्टच्या शोधात होते.

साऊथ वेस्ट इंग्लंडमधील ग्लूस्टरशायरच्या एका प्रयोगशाळेत मानवी मलमूत्र करोसिनमध्ये बदलण्याचा प्रयोग यशस्वी झाला.

जेम्स हेगेट आणि लंडनचे डॉक्टर सर्गियो लिमाने मिळून मानवी मलमुत्रापासून असे इंधन बनवले जे जेट इंधनाप्रमाणे काम करते.

या इंधनाला त्यांनी बायो क्रूड नाव दिले. 20 वर्षांपासून ते यासाठी प्रयत्नशील होते.

पूप इंधन हे स्टॅंडर्ड इंधनशी मिळतेजुळते असल्याचे इंटरनॅशन एविएशन रेग्युलेटर्सच्या संशोधनात समोर आले.

हे इंधन स्टॅंडर्ड इंधनच्या तुलनेत 90 टक्के कमी प्रदूषण करते.

एका वर्षात एक मनुष्य जितके मलमूत्र त्यागतो त्यातून 4 ते 5 लीटर बायो जेट इंधन बनू शकते असे वैज्ञानिक जेम्स हेगेटनी सांगितले.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story