फिकट आणि गडद रंगाचे कपडे वेगळे धुतल्याने रंग जाऊन ते खराब होण्याची शक्यता कमी होते व कपडे नव्यासारखे दिसतात.
कपड्यांचे रंग, प्रकार, ते किती मळले आहेत यानुसार विभागणी करा. कपड्यावर असलेल्या लेबलवर दिलेल्या विशिष्ट सूचना नक्की वाचा. त्यावर नमूद केल्यानुसार ते पिरगळू नका, त्यावरील शब्द मिटतील अशा पद्धतीनं धुवू नका.
कपड्यांची आतील बाजू बाहेर काढत ते उलटे करूनच मशिनमध्ये टाका. प्रिंटेड आणि नाजूक कपडे यामुळं सुरक्षित राहातात.
खराब व डाग पडलेले कपडे थोडा वेळ भिजवून ठेवा. असं केल्यास त्यावरील त्यावरील मळ आणि डागांचा चिवटपणा कमी होतो.
प्रमाणाहून जास्त डिटर्जंट वापरण्यानं कपड्यावर त्याचा परिणाम होतो. तर, कमी डिटर्जंट वापरल्यास कपडे चांगल्या प्रकारे धुतले जात नाहीत. वॉशिंग मशिनच्या कंट्रोल पॅनेलवर दिलेल्या डिटर्जंट स्कूप इंडिकेटरमुळे किती डिटर्जंट वापरावे हे कळते.
अनेक वॉशिंग मशिन्समधील लिंट कलेक्टरमध्ये काही वॉश सायकल्सनंतर बरीच घाण जमा होते. आठवड्यातून एकदा ते काढून नळाखाली स्वच्छ करावं. आठवड्यातून एकदा टब क्लीन फीचर वापरून ड्रममध्ये साचलेली घाण स्वच्छ करण्यानेही कपडे धुण्याचा दर्जा उंचावतो.
वॉशिंग मशिनच्या क्षमतेपेक्षा जास्त कपडे धुवायला टाकल्यास ते खळबळण्याची आणि स्वच्छ करण्याची क्षमता कमी होतो. त्यामुळे घर्षण व बिघाडही होऊ शकतो. त्यामुळं असं करणं टाळा
लोक बहुतेक प्रकारच्या लोडसाठी ऑटो वॉश निवडतात. पण, वॉशिंग मशिनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांसाठी वेगवेगळे प्रोग्राम दिलेले असतात. ते योग्य मोड निवडा.
अँटी- स्टेन आणि अँटी- जर्म वॉशसाठी स्टीम वॉश, इन- बिल्ट हीटर, जंतू काढून टाकण्याची क्षमता असलेले मशिन निवडा, जे तुमचे कपडे प्रभावीपणे स्वच्छ करेल आणि नव्यासारखे ठेवेल. गोदरेज अप्लायन्सेसनं दिलेल्या या टीप्स तुम्हीही लक्षात ठेवा.