पावसाळी दिवसांमध्ये, उन्हाळ्यात घाम आल्यामुळं किंवा इतर काही कारणांनी बाईक प्रवासादरम्यान वापरल्या जाणाऱ्या हेल्मेटमधून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते.
अशा वेळी बरीच मंडळी घरगुती क्लिनरच्या मदतीनं हेल्मेट स्वच्छ करताना दिसतात. पण, ते हेल्मेट अधिक खराब करताहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही. चला तर मग, पाहुया हेल्मेटची दुर्गंधी पळवण्यासाठीचे काही घरगुती उपाय...
बाजारात अनेक प्रकारचे हेल्मेट क्लिनर उपलब्ध आहेत. यातही फोम क्लिनरना विशेष प्राधान्य दिलं जातं. चिकटपणा कमी असणाऱ्या या क्लिनरनं हेल्मेट धुतल्यानंतर ते स्वच्छ करणं अधिक सोपं होतं.
हेल्मेट स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मायक्रोफायबर रॅग्स घेऊन ते व्यवस्थित स्वच्छ करू शकता. केस धुण्याचा शॅम्पू हातावर घेऊन रॅग्सनं तो आतल्या बाजूनं स्वच्छ केल्यास दुर्गंधी कमी होते.
रबिंग अल्कोहोलच्या मदतीनंही हेल्मेट स्वच्छ करता येतं. यासाठी तुम्हीला एका स्वच्छ रुमालाची गरज भासेल.
एक स्वच्छ रुमाल रबिंग अल्कोहोलमध्ये भिजवा आणि हेल्मेट आतून, बाहेरून स्वच्छ करून घ्या. यानंतर ते पूर्णपणे सुकं करून घ्या. यामुळं दुर्गंधी बऱ्याच अंशी दूर होईल.
ब्लिचिंग पावडरच्या मदतीनं तुम्ही हेल्मेट स्वच्छ करत त्यातील दुर्गंध पळवू शकता. यासाठी नेमकं काय करावं?
थोडं पाणी घ्या, यानंतर त्यात एक चमचा ब्लिचिंग पावडर मिसळून स्वच्छ कापड या पाण्यात भिजवून हेल्मेट आतून बाहेरून स्वच्छ पुसून घ्या. काही वेळासाठी ते उन्हात वाळवा.
पावसाळा असो वा उन्हाळा, हेल्मेट वापरताना एक बाब कायम लक्षात ठेवा की त्याचा वापर झाल्यानंतर ते बंद कपाटात न ठेवता पंख्याखाली किंवा मोकळ्या हवेत ठेवा.
हेल्मेट वापरण्यापूर्वी कायम डोक्यावर रुमाल किंवा एखादं कापड बांधा. यामुळं घाम कापडात शोषला जाऊन केस सुरक्षित राहतात.