12वी नंतर Google मध्ये नोकरी कशी मिळवायची? समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया

गुगलमध्ये नोकरी कशी मिळवायची?

गुगल ही जगातील टॉप कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीत नोकरी मिळणं इतकं सोपं नाही. 12 वी नंतर नेमकं काय केलं तर गुगलमध्ये नोकरी मिळेल असा प्रश्न अनेक तरुणांना पडतो.

बॅचलर्सची डिग्री

गुगलमध्ये खासकरुन तांत्रिक पदावरच भरती होते. नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे बॅचलर्सची डिग्री असणं आवश्यक आहे.

Resume अपडेट करा

गुगलमध्ये नोकरी हवी असल्यास सर्वात आधी तुमच्या Resume मध्ये नीट बदल करा. त्यामध्ये तुमच्या कौशल्यांचाही उल्लेख करा.

तुमच्या रिज्यूममध्ये कोर्स, जीपीए, शैक्षणिक उपलब्धी आणि प्रोजेक्टसंबंधी विस्ताराने लिहा. जर तुम्ही एखादा प्रमाणपत्र कोर्स केला असेल तर त्याचाही उल्लेख करा.

तुमच्या रिज्यूममध्ये वर्क स्ट्रॅटेजीबद्दलही लिहा. तुम्ही गुगलच्या विकासात काय योगदान देऊ शकता हे लिहा.

जर तुमच्या नेतृत्वकौशल्य असेल आणि एखाद्या संस्थेत भूमिका निभावली असेल तर त्याबद्दलही लिहा. याशिवाय टीम रणनीतीबद्दलही लिहा.

गुगलमध्ये नोकरी मिळण्यासाठी बरीच वर्षं लागतात. पण जर तुम्ही योग्य तयारी केली तर लगेच लठ्ठ पगाराची नोकरी मिळवू शकता.

जर तुम्हाला गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांची अधिकृत वेबसाईट Google.com आणि Google.com/careers वर जाऊन तपासू शकता.

VIEW ALL

Read Next Story