हिंदू धर्मात गंगा स्नानला पूजनीय महत्व आहे.
गंगा स्नान केल्याने मनुष्याचे पाप मिटतात, असे म्हणतात.
पण अनेकदा गंगेत स्नान करायला जाणं शक्य नसतं.
अशावेळी घरी गंगा स्नान करुन तुम्ही पुण्य प्राप्ती करु शकता.
यासाठी केवळ तुम्हाला त्याचे विधी माहिती असणे आवश्यक आहे.
स्नान करताना पाण्यात गंगेचं पाणी टाका आणि त्याने स्नान करा.
गंगेचं 2 थांबे पाणी असलं तरी सर्व पाणी पवित्र होतं असं म्हटलं जातं.
आंघोळीनंतर एका तांब्याच्या कलशात पाणी घ्या आणि त्यात गंगाजल टाका.
यानंतर आंब्याचे पान घेऊन ते पाणी घरामध्ये शिंपडा.
यामुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक उर्जा पसरते.
गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने पापातून मुक्ती मिळते.
यानंतर मोक्षप्राप्ती होते, असे म्हटले जाते.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)