मटण आणि चिकन हे ताजेच असते. पण शॉपवर विकताना अनेकजण शिळे मांस मिक्स करून विकतात. त्यामुळे आपण फसवले जातो. इथून पुढे मटण चिकन खरेदी करताना काय काळजी घ्यावी हे पाहुयात...
चिकन किंवा मटण ताजे असेल तर त्याचा रंग अगदी गडद असतो. पण शिळ्या चिकन मटणाचा रंग थोडा फिका पडलेला असतो.
मास ताजे असते तेव्हा त्याचा घाण वास येत नाही. पण शिळे झाल्यावर मांसावर प्रक्रिया होते आणि ते कुजायला लागते. त्यामुळे त्याचा दुर्गंध येतो.
चिकन किंवा मटण फ्रेश आहे हे ओळखायचे असल्यास ते स्पर्श करून तपासता येते. खरेदी करण्याआधी त्याला हात लावून पहावे.
चिकन हाताला चिकट लागले तर ते शिळे आहे असे समजावे. तर उलट ताजे मटण हाताला चिटकत नाही.
काहीवेळा आपण मटण फ्रेश आहे म्हणून घेऊन येतो आणि ते शिजवतो. त्यावेळी अगदीच शिळे असलेले मटण किंवा चिकन शिजायला वेळ लागतो.
मटण किंवा चिकन शिजल्यावरही त्यांचा रंग काळपट दिसतो. अशावेळी समजायचं की मटण किंवा चिकन खूपच शिळे आहे.
कोंबडीचे मांस हिरवे किंवा काळे असल्यास चिकन शिळे समजावे. मध्यमवयीन बकऱ्याचे मटण खाण्यासाठी चांगले मानले जाते. कोवळे मटण लगेच शिजते पण राळे होते. त्याची हाडं खाता येत नाहीत.
तसेच, वयाने जास्त असलेले बकऱ्याच मटण शिजायला वेळ लागतो आणि चवीला फार चांगलं लागत नाही.
मटण घेताना हाडे आणि मऊ समप्रमाणात घ्यावे. हाडांमुळे आमटीला चांगली चव येते. मऊ मटण खाण्यात सहसा सगळे आनंदी असतात. मांडीचा थोडा भाग घ्यावा. यात नळी मिळते. काळीज लहान मुलांसाठी चांगली असते त्यामूळे काळीज हमखास घ्यावे.