कंपनीकडून पीएफ खात्यात पैसे जमा केले जातायत की नाही? असं Check करा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात EPFO खात्यामध्ये कंपनीच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या पगारातील काही रक्कम भविष्यातील तरतुदींसाठी वेगळी काढण्यात येते.
ही रक्कम कंपनी वेळच्या वेळी नेमकी कशी तपासायची? यासाठीच्या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम EPFO पोर्टलवर भेट द्या. यासाठी सर्वप्रथम तुम्ही UAN क्रमांक Activate करा.
आता Our Services या टॅबवर क्लिक करून तिथं दिसणाऱ्या For Employees हा पर्याय निवडा.
सर्विस कॉलममध्ये दिसणाऱ्या Member Passbook या पर्यायाला निवडून UAN Number आणि Password आणि त्यानंतर कॅप्चा वापरा.
लॉग इन केल्यानंतर पुढे मेंबर आयडी द्या. यासाठी तुम्ही कंपनीच्या एचआरशी संपर्क साधा.
यानंतर EPF Bakance तपासून पाहा. इथं तुम्ही डिपॉजिट्स डिटेल, इस्टॅब्लिशमेंट आयडी, मेंबर आयडी, संस्थेचं नाव, एम्लॉई शेअर पाहू शकता.