तुम्ही चहाप्रेमी आहात का? नसाल तरी तुमच्या घरात किंवा मित्रयादीत एकतरी चहाप्रेमी नक्कीच असेल.
भारताच्या प्रत्येक घरात आपल्याला कितीतरी चहाप्रेमी पहायला मिळतील.
भारतात बऱ्याच लोकांच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊनच होते.
साधारणतः लोक दिवसभरात 3 ते 4 कप चहा घेतात. तर, काही लोक 5 ते 8 कप चहा दिवसभरात घेतात.
आता उन्हाळा सुरु झालाय. त्यामुळे चहाप्रेमींनी सावध झालं पाहिजे.
चहाचे जितके फायदे त्यापेक्षा जास्त तोटे आहेत.
उन्हाळ्यात जास्त चहा घेतल्याने गॅस, आंबट ढेकरं आणि अपचनाचा त्रास होतो.
जास्त चहा घेतल्याने पचनक्रियेत बिघाड आणि ब्लड शुगरचा देखिल त्रास होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, दिवसभरात 2 ते 3 कप एवढाच चहा घेतला पाहिजे.