भारतातील आग्रा येथे असलेला ताजमहाल हा जगातील सातव्या आश्चर्यांपैकी एक आहे. ताजमहालशी निगडित अनेक रोमांचक रहस्य आणि कहाण्या समोर येत असतात.
ताजमहाल आतापर्यंत तीन वेळा विकला गेला आहे असे तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल पण यामागचं नेमकं सत्य काय याविषयी जाणून घेऊयात.
देशात एक नटवरलाल नावाचा मोठा ठग होता. या व्यक्तीने देशातील ऐतिहासिक महत्व असणाऱ्या गोष्टींची विक्री केली.
नटवरलालबाबत असं म्हंटलं जातं की, त्याने एकदा राष्ट्रपती भवन, दोनदा लाल किल्ला आणि तीनवेळा ताजमहाल विकला होता.
नटवरलालने सरकारी अधिकारी बनून विदेशी पर्यटकांना खोटी कागदपत्रे देऊन देशातील अनेक ऐतिहासिक वास्तूंचे व्यवहार केले.
नटवरलाल हा बिहारच्या सिवान जिल्ह्याचा राहणारा होता. त्याचं खरं नाव हे मिथिलेश कुमार श्रीवास्तव होतं. त्याने अनेक खोटी नावं वापरून विदेशी लोकांना लुटले.
नटवरलालने माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची खोटी स्वाक्षरी करून राष्ट्रपती भवन विकल्याचे सुद्धा बोलले जाते.
नटवरलला याप्रकरणी 20 वर्षांचा तुरुंगवास झाला होता.