आपल्या देशाला हे नाव ब्रिटीशांनी दिलंय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात, कारण...
मुंबईमध्ये I.N.D.I.A आघाडीची तिसरी बैठक 31 सप्टेंबर आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.
पण मूळात आपल्या देशालाच INDIA हे नाव कसं पडलं तुम्हाला ठाऊक आहे का? याबद्दल जाणून घेऊयात...
इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिल्याचं अनेकांना वाटतं. मात्र हे नाव आपल्या देशाला ब्रिटीशांनी दिलेलं नाही.
इंडिया हा शब्द मूळच्या लॅटीन भाषेतून आला आहे.
इंडिया नावाबद्दल सांगायचं झाल्यास हा शब्द इंडस या मूळ लॅटीन भाषेतील शब्दावरुन जन्माला आला आहे.
इंडस या पर्शियन नावाने सिंधू नदी ओळखळी जायची.
याच नदीच्या आजूबाजूचा परिसर या अर्थाने सिंधू नदीच्या पूर्वेकडील भूभागाला ग्रीक आणि पर्शियन लोकांनी इंडिया असं नाव दिल्याचं सांगितलं जातं.
नंतर हळूहळू सिंधू नदीपासून ते पूर्व आणि दक्षिणेपर्यंतच्या भूभागाला इंडिया नावाने संबोधलं जाऊ लागल्याचं सांगण्यात येतं.
अगदी हडप्पा मोहेंजो-दारो संस्कृतीपासून सिंधूच्या खोऱ्यामध्ये मानवाची वस्ती असल्याने इंडिया या नावाचा उगम स्थान अगदी काही हजार वर्षांपूर्वीचा असल्याचं मानलं जातं.