संस्कार आणि आरोग्य

संस्कार आणि आरोग्य... वाचा पाया पडण्याचे फायदे

Sep 13,2023

पाठदुखीपासून आराम

मोठ्यांचा आशीर्वाद घेताना आपण ज्या पद्धतीनं वाकतो त्यामुळं कंबर आणि पाठीचे स्नायू मोकळे होतात आणि त्यांना आराम मिळते.

त्वचा आणि केसांचं आरोग्य

आरोग्यविषयक जाणकारांच्या मते घरातल्या मोठ्यांच्या पाया पडताना कंबरेतून वाकण्याची क्रिया घडते आणि त्याचा फायदा त्वचा, केसांच्या आरोग्यासाठी होतो.

हृदयाचं आरोग्य

योगसाधनेत पाया पडण्याच्या क्रियेला साष्टांग प्रणाम असं म्हणतात. हा प्रकार सूर्यनमस्काराच्या वेळी केला जातो. ज्याचा फायदा हृदय निरोगी ठेवण्यास होतो.

रक्तप्रवाह सुरळीत होतो

पायांना स्पर्श करून मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यामुळं शरीरातील रक्तवाहिन्या उत्तमरित्या काम करु लागतात.

अॅक्युप्रेशर

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हाताची बोटं पायांना स्पर्श करतात तेव्हा ही क्रिया अॅक्युप्रेशरचं काम करते. ज्यामुळं शरीरातील काही प्रेशर पॉईंट्स सक्रिय होतात. याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

थोडक्यात...

थोडक्यात इथून पुुढं कोणी पाया पडायला आलं तर त्यांना थांबवू नका आणि तुम्हीही आवर्जून मोठ्यांच्या पाया पडा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. इथं दोघांचाही फायदा...

सर्वसामान्य संदर्भ

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )

VIEW ALL

Read Next Story