रेल्वेच्या ट्रॅकमध्ये जॉइंटच्या ठिकाणी मोकळी जागा

भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटलं जातं. रोज हजारो लोक ट्रेनमधून प्रवास करतात. पण तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल तर रेल्वेच्या ट्रॅकमध्ये जॉइंटच्या ठिकाणी मोकळी जागा किंवा गॅप असतो.

यामागे एक कारण

रेल्वेच्या ट्रॅकमध्ये असणारा हा गॅप पाहिल्यानंतर यामुळे दुर्घटना तर होणार नाही ना अशी शंका तुमच्या मनात येत असेल. पण यामागे एक कारण आहे, ते जाणून घ्या.

ट्रॅक उभारताना सोडला जातो गॅप

रेल्वेच्या ट्रॅकच्या जॉइंटमध्ये असणाऱ्या या गॅपमुळे ट्रेन दुर्घटनाग्रस्त होत नाही, याउलट दुर्घटना होऊ नये यासाठी ट्रॅक उभारताना त्यात हा गॅप सोडला जातो. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे.

तापमानात होणारे बदल कारणीभूत

रेल्वे ट्रॅकच्या मधे गॅप सोडण्यामागे तापमानात होणारे बदल महत्वाचं कारण आहे. ज्यामुळे ट्रॅक विस्तृत किंवा संकुचित होऊ शकतो.

..म्हणून ट्रॅकमधील जॉइंटमध्ये गॅप

रेल्वे ट्रॅक लोखंडापासून तयार केला जातो. हिवाळ्यात लोखंड संकुचित पावतं आणि उन्हाळ्यात ती विस्तृत होते. यामुळेच ट्रॅकमधील जॉइंटमध्ये गॅप सोडला जातो.

ट्रॅक वाकडा होण्याची शक्यता

जर रेल्वे ट्रॅक जोडताना त्यात गॅप ठेवला नाही तर विस्तृत झाल्याने ट्रॅक वाकडा होण्याची शक्यता असते.

ट्रॅकवर पडणार जोरही कमी होतो

याशिवाय हा गॅप ट्रॅकवर धावणाऱ्या ट्रेनचा आवाज कमी करतो. तसंच ट्रॅकवर पडणार जोरही कमी होतो.

गॅपच्या जागी वेल्डिंग

मात्र आता भारतीय रेल्वे ट्रॅकमधील गॅप कमी करत आहे. गॅपच्या जागी वेल्डिंग करत पूर्ण लाइन एकत्र केली जात आहे. पण तरीही थोडासा गॅप ठेवलाच जातो.

VIEW ALL

Read Next Story