भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी 'नॅशनल युनिटी डे' साजरा केला जातो.

गुजरात येथील केवडिया येथे सरदार सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. 31 ऑक्टोबर, 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते.

या पुतळ्याला 'स्टॅचु ऑफ युनिटी' असेही म्हंटले जाते. जगातील सर्वात उंच या पुतळ्याची ऊंची 182 मी. इतकी आहे.

हा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल जे स्वतंत्र भारतातील पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते यांना आदरांजली आहे.

गुजरातमधील नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाजवळ हा पुतळा बांधण्यात आला आहे.

पुतळ्याचे बांधकाम ऑक्टोबर 2014 मध्ये सुरू झाले आणि ते पूर्ण होण्यास चार वर्षांचा कालावधी लागला.

या पुतळ्याची रचना भारतीय शिल्पकार राम व्ही. सुतार यांनी केली होती.

आजच्या घडीला हा पुतळा भारतातील एक प्रमुख पर्यटन स्थळ झाला आहे. जगभरातील लोक हा पुतळा पाहण्यासाठी गुजरातला भेट देतात.

सरदार पटेलांच्या जीवनावर आधारित कथांवर येथे संध्याकाळी लेजर शो आणि साऊंड शो आयोजित केला जातो.

हा पुतळा भारताच्या एकजुटीची णि एकात्मतेची कल्पना दर्शवतो. हे राष्ट्रीय अभिमान आणि एकतेचे प्रतीक आहे.

VIEW ALL

Read Next Story