यासाठी तुम्हाला 1 हजार रुपये रक्कम भरावी लागणार असून, तुम्हाला एक किट दिलं जाईल. 'हॉन्टेड वॉक' लिहिलेली बॅग, त्यामध्ये बॅटरी आणि एक काठी असेल. शिवाय टोपी, बॅड्ज, बँड, पाण्याची बाटली, फळ आणि मफिनही देण्यात येईल.
delhitourism.gov.in आणि 'देखो मेरी दिल्ली' या अॅपवरून तुम्हीही या सफरीमध्ये सहभागी होण्यासाठीची बुकींग करु शकता.
दर दिवशी एका ठिकाणी हे हॉन्टेड वॉक 6 वेळा होतील. यामध्ये 20 पर्यटक आणि एक गाईड असेल.
अनेकांसाठी एकाकी असणाऱ्या या ठिकाणांवर सायंकाळी 5.30 ते 9.30 या वेळेत जाता येणार आहे. असं म्हणतात की या ठिकाणांना स्वत:चा असा इतिहास असून, त्याबाबतच्या अनेक कथा- कहाण्या सांगितल्या जातात.
भूली भटियारी का महल, फिरोजशाह कोटला, तुघलकाबाद किल्ला, मालता महल अशा ठिकाणांना आता पर्यटनाच्या हेतूनं सायंकाळी भेट देता येणार आहे.
दिल्लीमध्ये जी ठिकाणं Haunted म्हणून ओळखली जातात तिथे पर्यटन विभागाकडून हॅरिटेज वॉकची सुरुवात केली जाणार आहे.
बापरे! सरकारचा हा कसला उपक्रम? पैसे द्या भूत बघा; 'या' Haunted Places पाहण्याची संधी