दहीहंडी, गोपाळकाला निमित्त नातलगांना द्या 'या' खास शुभेच्छा

देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जोशात आणि आनंदात साजरा केला जातो. ढाक्कुमाकूम च्या तालावर अबालवृद्ध ठेका धरतात. तर अशा या सर्वांच्या लाडक्या सणाच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबीयांना खास मराठीतून द्या. देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जोशात आणि आनंदात साजरा केला जातो. ढाक्कुमाकूम च्या तालावर अबालवृद्ध ठेका धरतात. तर अशा या सर्वांच्या लाडक्या सणाच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबीयांना खास मराठीतून द्या.

हे आला रे आला गोविंदा आला… गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा… दहीहंडीच्या खूप-खूप शुभेच्छा!

लय झाली ”दुनियादारी” खूप बघितली ”लय भारी” आता फक्त आणि फक्त करायची.. दहीहंडीची तयारी..!

विसरून सारे मतभेद, लोभ अहंकार दूर सोडा.. सर्वधर्म समभाव मनात जागवून, आपुलकीची दहीहंडी फोडा. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!

आमच्या हृदयात आहे तुझं स्थान हे नंदलाला लवकर ये आणि दहीहंडी फोड! गोपाळकाल्याच्या शुभेच्छा!

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग, मात्र अतिउत्साहात करू नका नियमभंग.. सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

दह्यात साखर साखरेत भात उंच दहीहंडी उभारु देऊन एकमेकांना साथ फोडु हंडी लाऊन थरावर थर जोशात साजरा करू दहीहंडीचा उत्सव! सर्व बालगोपाळांना, गोविंदाना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

मित्रांनो, थराला या! नाहीतर, धरायला या!! आपला समजून, गोविंदाला या!!! दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!

गोविंदा आला रे आला.. दहीहंडीच्या समस्त बाळ गोपाळांना शुभेच्छा..!

VIEW ALL

Read Next Story