स्वयंपाकघरात कुकरचा अनेक कारणांसाठी वापर केला जातो.
खासकरुन डाळ नेहमी कुकरमध्ये शिटी लावून शिजवली जाते.
पण अनेकदा शिटी वाजल्यानंतर कुकरमधील पाणी बाहेर झाकणावर येतं आणि त्यामुळे ते पिवळं पडतं.
कुकरचं झाकण चकाचक ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही टिश्यू पेपरची एक ट्रिक फॉलो करु शकतात. जाणून घ्या हा सोपा उपाय
एक टिश्यू पेपर घ्या आणि त्याला मधोमध शिटी येईल अशा ठिकाणी छिद्र पाडा. यानंतर तो कुकरच्या झाकणावर लावा.
शिटीतून निघणारं पिवळं पाणी हे टिश्यू पेपर शोषून घेईल. यामुळे तुमचं झाकण खराब होणार नाही.