एका अपघात प्रकरणावर सुनावणी करताना कोर्टाने ही टिप्पणी केली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के.व्ही. विश्वनाथन यांनी अपघातात मरण पावलेल्या महिलेच्या कुटुंबाला भरपाई वाढवण्याचे निर्देश दिले होते.
कुटुंबाने हायकोर्टात अधिक नुकसान भरपाईसाठी अपील केले होते. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली कारण मृत महिला ही गृहिणी होती.
त्यानंतर वाहन मालकाला मृत महिलेच्या कुटुंबाला पैसे देण्याचे निर्देश देत न्यायालयाने गृहिणीचे महत्त्व कधीही कमी लेखू नये, असे म्हटलं आहे.
गृहिणी दिवसभरात घरात असते याचा असा अर्थ नाही की ती काहीच काम करीत नाही. महिलेने घरात केलेल्या कामाचे मूल्य ऑफिसमधून पगार मिळविणाऱ्यापेक्षा कमी नाही.
घराची काळजी घेणाऱ्या महिलेची भूमिका उच्च दर्जाची असते आणि तिचे योगदान पैशात मोजणे कठीण आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
एका गृहिणीचे उत्पन्न रोजंदारी कामगारापेक्षा कमी कसे मानले जाऊ शकते? आम्हाला हा प्रकार मान्य नाही. गृहिणीच्या कामाचे मूल्य कधीही कमी लेखू नये, असेही कोर्टानं म्हटलं आहे.
जितके महत्त्व ऑफिसमधून पगार मिळविणाऱ्याचे असते तितकेच कुटुंबात गृहिणीची भूमिका करणाऱ्याची असते. गृहिणीचे काम एक एक करून मोजले तर निःसंशयपणे तिचे योगदान अमूल्य ठरेल, असे कोर्टानं म्हटलं.