9 डिसेंबर 1946 मध्ये इटलीच्या लुईझियानामध्ये सोनिया गांधी यांच्या जन्म झाला. ख्रिश्चन धर्मगुरुने त्यांचं एडविग एंटोनियो अल्बीना माइनो असं नाव ठेवलं.

पण वडील स्टीफेनो यांना हे नाव पसंत नव्हतं. आपला जीव वाचवणाऱ्या कुटुंबाला श्रद्धांजली देण्यासाठी मुलीचं रुसी नाव ठेवण्याची त्यांची इच्छा होती.

वडिल स्टीफेनो यांनी सोनिया असं त्यांचं नाव ठेवलं. या संपूर्ण घटनाक्रमांचा उल्लेख 'द रेड साडी' या पुस्तकात करण्यात आला आहे.

1964 मध्ये सोनिया गांधी यांनी शिक्षणासाठी ब्रिटनच्या केंब्रिजमध्ये प्रवेश घेतला. इथेच माजी पंतप्रधान राजीव गांधीही शिकत होते.

1968 मध्ये राजीव आणि सोनिया गांधी यांनी लग्न केलं. हे लग्न अमिताभ बच्चन यांच्या घरी झाल्याचं सांगितंल जातं.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी म्हणून सोनिया गांधी भारतात आल्या. अनेक चढउतारानंतरही त्या राजकारणापासून दूर होत्या.

पण राजीव गांधी यांच्या निधनानंतरत्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्या म्हणून त्यांनी स्वत:ला प्रस्तापित केलं.

VIEW ALL

Read Next Story