काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर थेट मोटरसायकल दुरुस्त करण्याची वेळ आली असं हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच वाटेल. पण यामागे एक खास कारण आहे.
राहुल गांधी हे सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतात. सध्या ते चर्चेत आहेत मोटरसायकलमुळे. त्यांचे फोटो व्हायरल होत असून या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.
राहुल गांधींनी नवी दिल्लीमधील करोल बाग येथील एका मोटरसायकल दुरुस्त करणाऱ्या गॅरेजला भेट दिली. या भेटीचे फोटो राहुल यांनीच शेअर केले आहेत.
"पान्हा फिरवणाऱ्या आणि भारताची चाके फिरवणाऱ्या हातांकडून शिकताना," अशी कॅप्शनसहीत राहुल गांधींनी हे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये राहुल गांधी बाईक दुरुस्त करणाऱ्या कामगारांकडून त्यांच्या कामांबद्दल आणि समस्यांबद्दल चर्चा करतानाही दिसत आहेत.
"यही हाथ हिंदुस्तान बनाते हैं, इन कपड़ों पर लगी कालिख, हमारी ख़ुद्दारी और शान है| ऐसे हाथों को हौसला देने का काम एक जननायक ही करता है", अशा कॅफ्शनसहीत काँग्रेसच्या अकाऊंटवरुन हे फोटो शेअर करण्यात आलेत.
राहुल गांधींनी घेतलेली ही भेट भारत जोडो यात्रेचाचा भाग असल्याचंही काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मागील काही दिवसांपासून राहुल अशाप्रकारे अचानक समाजातील वेगवेगळ्या स्थरातील लोकांना भेटी देत आहेत.
काही आठवड्यांपूर्वीच राहुल गांधींनी ट्रकचालकांना भेट दिली होती. त्यांनी ट्रकने प्रवास करत चालकांच्या समस्या जाणून घेतलेल्या.
राहुल गांधींनी दिल्ली ते चंदीगडदरम्यानचा प्रवास ट्रकने केला होता. मध्यंतरी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाही त्यांनी वॉशिंग्टन डीसी ते न्यूयॉर्क हा प्रवास एका पंजाबी ट्रकचालकाच्या ट्रकमधूनच केला होता.
राहुल गांधींनी एका ढाब्यावर थांबून ट्रकचालकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.