बारावी आर्ट्सनंतर करिअरचे 10 पर्याय

बारावी आर्ट्स केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात करिअरची संधी मिळते? 10 पर्यायाबद्दल जाणून घेऊया.

Pravin Dabholkar
Mar 19,2024


बॅचलर ऑफ फाइन आर्ट्समध्ये करिअर करुन तुम्ही स्क्लप्चर, पेंटीग, म्युझिक, फिल्म मेकींगची आवड पूर्ण करु शकता.


स्टाईल, क्रिएटीव्हीटी असेल तर तुम्ही फॅशन डिझाइनिंगमध्ये करिअर करु शकता.


बारावी आर्ट्सनंतर बॅचलर ऑफ जर्नलिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन करण्याची संधी असते. टीव्ही, वेबसाइट, रेडीओ अशा ठिकाणी तुम्ही काम करु शकता.


तुमचं कम्युनिकेशन, प्लानिंक चांगलं असेल तर बारावी आर्ट्सनंतर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर करु शकता.


बारावी आर्ट्सनंतर इकोनॉमिक्समध्ये करिअर करणं आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय ठरु शकतो.


मानवी स्वभाव जाणून घेण्याची आवड असल्यास सायकोलॉजीमध्ये करिअर करु शकता.


बारावी आर्ट्सनंतर शिक्षकी पेशा हा पर्यायदेखील अनेकांच्या पसंतीचा असतो.


बारावी आर्ट्सनंतर लॉ करण्याचा पर्याय तुमच्यासमोर असतो.


बारावी आर्ट्स करुन नागरी सेवांमध्ये जाऊन चांगल्या पगाराची सरकारी नोकरी करु शकता.


बारावी आर्ट्सनंतर सोशल वर्क हे आवडीचे आणि कमाईचे साधन होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story